राज्य
इन्व्हर्टर बॅटरी चोर पोलिसांच्या जाळ्यात; नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
परभणी (प्रतिनिधी)–
शहरातील समाधान नगर भागात राहणाऱ्या रितेश संतोष वायकोस या युवकाने इन्व्हर्टर बॅटरी चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, पोलिसांनी त्यास अटक करून त्याच्याकडून इन्व्हर्टर बॅटरी जप्त केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, सहाय्यक निरीक्षक राजू मुत्तेपोड, उपनिरीक्षक गोपीनाथ वाघमारे तसेच अंमलदार सूर्यकांत फड, रवी जाधव, निलेश परसोडे व रफिक शेख यांच्या पथकाने केली.
गुरुवारी ८ मे रोजी नवा मोंढा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीकडून पुढील तपास सुरू आहे.