परभणी–
शहरातील राष्ट्रीय महामार्ग व उड्डाण पुलावर होणाऱ्या वाढत्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी मंगळवार (दि. ६)रोजी बैठक घेतली.
या बैठकीस महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप पाटील, आरटीओ आशिष पाराशरे, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर डंबाळे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे ज्ञानोबा ढाकणे, वाहतूक पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ननवरे, नानालपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती कारवार, नवा मोंढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके, जनसंपर्क अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिलू, महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास नाटकर व वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदार यांची उपस्थिती होती. परभणी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आणि उड्डाणपूलावर मागील काही दिवसांपासून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था, पार्किंग पॉईंट याविषयी या बैठकीत चर्चा करून उपाय योजना आखण्याविषयी या बैठकीत विचार विनिमय करण्यात आला.