सायळा (सूनेगाव) पाटीवरील घटनेतील गंभीर जखमी तरुणाचा मृत्यू – गुन्ह्यात आता खुनाचा कलम जोडणार
गंगाखेड तालुक्यातील सायळा (सूनेगाव) येथील विष्णू उर्फ सचिन मारोतराव पवार या 25 वर्षीय तरुणावर 3 मे रोजी मध्यरात्री गावातीलच चौघांनी हल्ला केला होता. अपघात असल्याचे भासवत त्याला गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु कुटुंबीयांनी घातपाताचा संशय व्यक्त करत 5 मे रोजी गंगाखेड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणात आरोपींना अटकही झाली, परंतु गंभीर जखमी विष्णूचा 8 मे रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने आता गुन्ह्यात खुनाचा कलम जोडले जाणार आहे, अशी माहिती तपास अधिकारी सपोनि सिद्धार्थ इंगळे यांनी दिली आहे. या घटनेमुळे सायळा ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली असून आरोपींच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे बोलले जात आहे