परभणी पोलिसांची अवैध वाळू वाहतूक प्रकरणावर धडक कारवाई
परभणी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध वाळू वाहतुकीविरोधात विशेष मोहिम राबवली जात असून, या अंतर्गत विविध पोलीस पथकांकडून सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत.
बुधवारी पाथरी आणि पालम परिसरात अशाच दोन कारवायांमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करत आरोपींविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
१. पाथरी तालुक्यातील कारवाई:
विटा शिवारातून लिंबा गावाजवळ अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर पोलिसांनी ताब्यात घेतला. या प्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई गोपीनाथ वाघमारे, विलास सातपुते, संजय घुगे, मधुकर ढवळे, गजानन क्षीरसागर यांच्या पथकाने केली.
२. पालम तालुक्यातील कारवाई:
गंगाखेड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील खुरलेवाडी येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे तीन लाख रुपयांचे वाहन आणि सात हजार रुपयांची वाळू असा एकूण ३.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली. ही कारवाई कागणे, परसोडे, गायकवाड, निलपत्रेवार आणि सावंत यांच्या पथकाने केली.
परभणी पोलिसांची ही कारवाई अवैध वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे.