परभणी ग्रामीण हद्दीतील जबरी चोरी प्रकरणातील आरोपी नांदेडमधून अटकेत
स्थानिय गुन्हे शाखेचे कार्य
परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या जबरी चोरीच्या प्रकरणातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यातील खानापूर फाटा परिसरातून ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विनोद जगन्नाथ शिंदे (रा. परभणी) असे आहे.
या आरोपीविरुद्ध गु.र.नं. ५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३११, ६४(एल), ७०(१), ३३३, ३५१ अंतर्गत परभणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलेला होता. मंगळवारी विनोद शिंदे हा नांदेड परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली. पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी त्याला परभणी ग्रामीण पोलिस ठाण्याकडे सुपुर्द करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रवींद्रसिंह संतोषसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, सुग्रीव केंद्रे, शंकर गायकवाड, दिपक मुदीराज, गणेश कौटकर यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.