परभणीच्या आर.पी. हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट तर्फे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आमदार डॉ. पाटील यांच्या हस्ते रविवारी बसस्थानक येथे झाला.
🕘 सेवा वेळ: सकाळी 9 ते सायंकाळी 5
⏱️ दर 30 मिनिटांनी बस उपलब्ध
📍 मार्ग: परभणी बस स्थानक ↔️ आर.पी. हॉस्पिटल, पाथरी रोड
या सेवेचा लाभ ग्रामीण भागातील रुग्णांना होणार असून त्यांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा अधिक सुलभ होणार आहेत. दोन मोफत बसेसची व्यवस्था रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज आहे!
🎙️ यावेळी उपस्थित होते:
डॉ. विवेक नावंदर, डॉ. आमेर तडवी, संजय गाडगे, अनिल डहाळे, अरविंद देशमुख, सुभाष जोंधळे, रामराव डोंगरे, बाळराजे तळेकर, मनोज पवार, बंडूनाना बिडकर, राहुल कांबळे, अशोक गव्हाणे, महेश पारवेकर, केदार दुधारे, अमोल कदम, निखिल जैन, अजय चव्हाण,हरमोहनसिंग टाक आणि इतर अनेक मान्यवर.
👏 मोफत बस सेवा आणि परवडणाऱ्या दरात उत्तम वैद्यकीय सेवा — आर.पी. हॉस्पिटलचा हा उपक्रम रुग्णसेवेचा नवा मानदंड ठरणार आहे!