हनुमानजी चे वैशिष्ट्य — मुखी राम नाम,हाती राम काम- ते ही निष्काम–
पेडा शब्द का अर्थ मिठाई होता है — वैसे ही भगवान का नाम लेने से जीवन मे मिठास निश्चित आएगी–
जिल्हा प्रतिनिधी, परभणी:
परभणी शहरातील रेल्वे स्टेशनजवळ वसलेले प्राचीन श्री पेड़ा हनुमान मंदिर येथे आज शनिवार, ५ जुलै रोजी ७९ वा प्राणप्रतिष्ठा महोत्सव उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
🔸 मंदिराचे मुख्य पुजारी श्रीराम विष्णुदत्त तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, निजाम काळात नीमाच्या झाडाखाली चबुतऱ्यावर हनुमान मूर्ती स्थापित होती. गुंज खुर्द येथील महात्मा शंकरलालजी यांच्या आदेशाने पं. सूर्यनारायण तिवारी यांनी पूजासेवा सुरू केली.
दररोज रामायण पाठ होत असे. न्यायालयाजवळ असल्यामुळे अनेक नागरिक न्यायालयात जाण्यापूर्वी दर्शन घेत असत. भक्त पेढा ठेवून नतमस्तक होत आणि याच परंपरेमुळे “पेड़ा हनुमान” नाव प्रसिद्ध झाले.
🔸 १९४० च्या दशकात जहांगीर येथील महंतांनी आर्थिक मदत दिली. पं. तिवारी यांनी मकराना (राजस्थान) येथे जाऊन श्रीगणेश, श्रीराम, लक्ष्मण, माता सीता यांच्या सुंदर मूर्ती घेवून आल्या. काशीच्या पं. सत्यनारायणजी शास्त्री व महात्मा गुंज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा पार पडली.
🔸 मंदिराची बांधणी भगीरथ राजासाहेबांच्या मदतीने व सभामंडपाची उभारणी परसराम कालानी व शिवजीगोविंदजी यांच्या देखरेखीखाली झाली.
🔸 पं. तिवारी यांनी आपल्या भावाच्या मुलाला, श्रीराम तिवारी यांना लहानपणापासूनच मंदिर सेवा व पूजेसाठी जवळ ठेवले. आजही श्रीराम तिवारी, त्यांच्या पत्नी, योगेश व निलेश तिवारी सेवा बजावत आहेत.
🔸 या मंदिरात श्रीराम नवमी, हनुमान जयंती, जन्माष्टमी, रामकथा, अन्नकूट, दीपावली यासारखे उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरे होतात.
🔸 काही वर्षांपूर्वी परभणीचे ज्येष्ठ व्यापारी रामकिशन भुतडा यांनी ११ ब्राह्मणांच्या हस्ते अभिषेकाचा प्रस्ताव दिला आणि त्यावेळी यजमानत्वही घेतले. त्यानंतर दरवर्षी वेगळे यजमान असतात. २०३१ पर्यंत यजमानांची नोंदणी पूर्ण झाली आहे.
यंदाच्या महोत्सवाचे वेळापत्रक –
५:०० सकाळी – १:०० दुपारी : श्री गणेश, श्रीराम-लक्ष्मण, माता सीता व श्री हनुमान अभिषेक
त्यानंतर श्री हनुमानजींचे वस्त्र व अलंकार पूजन
यजमानाकडून नैवेद्य अर्पण व महाआरती
७:३० रात्रि : संध्या आरती
🎶 ८:०० रात्रि संगीतमय सुंदरकांड
६ जुलै, रविवारी सकाळी ६:३० पासून पुढील २४ तास श्रीरामचरितमानस अखंड पारायण
🌸 महिला मंडळातर्फे २६ जून पासून दररोज घेतले जात असलेले नवाह्न पारायण ४ जुलै रोजी संध्याकाळी समाप्त झाले.
सर्व भक्तजनांनी या पवित्र कार्यक्रमात उपस्थित राहून पुण्य लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था द्वारा करण्यात आले आहे.