आर.पी.आर.पी. हॉस्पिटल – परभणीकरांसाठी आधुनिक आरोग्यसेवेचा विश्वासार्ह आधार.
परभणी —हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश!
९ वर्षांच्या बालकाचे प्राण वाचले, मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया
खेळताना डोक्याला बॅट लागून गंभीर दुखापत झालेल्या ९ वर्षांच्या बालकावर परभणीतील आर.पी. हॉस्पिटल अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे तातडीने मेंदूवरील शस्त्रक्रिया करून यशस्वी उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे आणि आधुनिक वैद्यकीय सुविधेमुळे या बालकाचे प्राण वाचले.
घटना अशी घडली की – बालक खेळताना मित्राच्या बॅटचा जोरदार फटका डोक्याला बसल्याने त्याला उलट्या व डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. तात्काळ त्याला आर.पी. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉ. आमेर खान यांच्या प्राथमिक तपासणीत डोक्याच्या कवटीचे हाड मोडले असल्याचे स्पष्ट झाले. प्रसिद्ध न्यूरो सर्जन डॉ. दत्तात्रय किरडे यांनी गंभीर स्थिती लक्षात घेऊन तात्काळ शस्त्रक्रिया केली.
या शस्त्रक्रियेत डॉ. आमीर तडवी, डॉ. श्रीकांत वांगीकर, डॉ. उर्वशी, डॉ. शिवानी नाईक यांच्यासह संध्या आळणे, किशोर नवले, पवन लोंढे यांचा मोलाचा सहभाग होता. ऑपरेशननंतर बालकाची प्रकृती स्थिर असून, जीवाला असलेला धोका टळला आहे.
आर.पी. हॉस्पिटलचे प्रमुख आमदार डॉ. राहुल पाटील यांनी सांगितले की, “ही शस्त्रक्रिया आमच्या तज्ज्ञ डॉक्टरांची मेहनत आणि सुसज्ज वैद्यकीय सुविधांचे यश आहे. परभणीतही आता मोठ्या शहरांसारख्या जटिल शस्त्रक्रिया शक्य आहेत, हे आमच्या कार्यक्षमतेचे उदाहरण आहे.”
बालकाच्या नातेवाइकांनी भावूक होत आभार मानले – “आमच्या मुलाला नवे आयुष्य मिळाले. आम्ही आर.पी. हॉस्पिटलच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो.”