प्रतिनिधि परभणी—
आर. पी. हॉस्पिटल, परभणी येथे जिल्ह्यातील पहिली रोटेशनल अथेरेक्टॉमी प्रक्रिया 75 वर्षीय महिलेस यशस्वीरित्या पार पडली. अत्याधुनिक बोस्टन रोटा प्रो डिव्हाइस चा वापर करत ही अँजिओप्लास्टी करण्यात आली.
या ऐतिहासिक यशामागे आमदार डॉ. राहुल पाटील यांची दूरदृष्टी व प्रयत्न, अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे यांचे मार्गदर्शन आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. दीपक कुबडे यांची अतुलनीय भूमिका आहे. त्यांना साथ दिली डॉ. सलाम तांबोळी, डॉ. दैठणकर, डॉ. अमीर तडवी, डॉ. संतोष हारकळ आणि डॉ. शहाजी बोडखे यांनी.
रोटेशनल अथेरेक्टॉमी ही हृदयातील कठीण आणि कॅल्शियमयुक्त ब्लॉकेज काढण्यासाठीची प्रगत प्रक्रिया आहे, जी हृदयविकाराचा धोका कमी करते आणि रक्तप्रवाह सुधारते.
आर. पी. हॉस्पिटलमध्ये ही प्रक्रिया यशस्वी होणे हा परभणीच्या वैद्यकीय प्रगतीचा मैलाचा दगड आहे!