पूर्णा नदीने घेतला अजून एक निरागस जीव… अजय वैद्य या ११ वर्षीय बालकाचा मृतदेह १८ तासांच्या शोधानंतर सापडला. संपूर्ण गावात शोककळा…
—
पूर्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय अजय वैद्यचा मृतदेह १८ तासांच्या शोध मोहिमेनंतर बुधवारी सकाळी बॉम्बे पुलाजवळ आढळून आला. अजय व त्याचा भाऊ पांडुरंग शेळ्या चारताना नदीत पोहण्यासाठी उतरले असता ही दुर्दैवी घटना घडली. सिद्धेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे अजय वाहून गेला.
गावकऱ्यांनी व आपत्ती व्यवस्थापन पथकाने अखंड शोध घेतल्यानंतर अजयचा मृतदेह सापडला. घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून अंत्यविधी शोकाकुल वातावरणात पार पडला.
पूर्णा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद; अधिक तपास सुरू आहे.