दहशतवादाच्या अड्ड्यांवर केलेली कारवाई शौर्य आणि निर्धाराचे प्रतीक – सुशांत एकोर्गे
भारतीय जवानांच्या शौर्यगाथेचा अभाविपने पेढे आणि साखर वाटून साजरा केला आनंदोत्सव
परभणी | ७ मे –
भारतीय सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर केलेली कारवाई ही शौर्य आणि निर्धाराचे प्रतीक आहे, असे मत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देवगिरी प्रांत सहमंत्री सुशांत एकोर्गे यांनी व्यक्त केले.
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे भ्याड दहशतवादी हल्ला झाला, ज्यात २७ निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायुदलाने ७ मे रोजी पहाटे पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत हवाई हल्ला केला.
या अभूतपूर्व शौर्याबद्दल अभाविप परभणी शहर शाखेने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, नागरिकांना व व्यापाऱ्यांना पेढे व साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
या वेळी जिल्हा संयोजक मुक्तेश भंडारी, शहर सहमंत्री अमरजा नरवाडकर, अनिश शहाणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
एकोर्गे म्हणाले:
“भारत सरकार आणि आपल्या शूर जवानांनी दाखवलेली शौर्यगाथा अभिमानास्पद आहे. प्रत्येक नागरिकाने सजग राहून आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. आजचा भारत दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम आहे.”
–