आर.पी. हॉस्पिटलमध्ये प्रथमच मोफत फिस्टुला शस्त्रक्रिया यशस्वी —
आरोग्य सेवेत दमदार पाऊल–
परभणी, दिनांक ११ जून २०२५
पाथरी रोडवरील आर.पी. हॉस्पिटल मध्ये महा. फुले जनआरोग्य योजने अंतर्गत डायलिसिससाठी आवश्यक असलेली एव्ही फिस्टुला शस्त्रक्रिया यशस्वीपणे मोफत करण्यात आली आहे.
ही सुविधा परभणीतील मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी मोठा दिलासा ठरली आहे. याआधी रुग्णांना छ. संभाजीनगर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. आता हीच शस्त्रक्रिया स्थानीक पातळीवर आणि मोफत उपलब्ध झाल्याने रुग्णांचा वेळ, पैसा आणि प्रवास वाचणार आहे.
डॉ. प्रमोद शिंदे अधिष्ठाता, आर.पी. हॉस्पिटल म्हणाले की, “आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना हे मोठे पाठबळ आहे. भविष्यात आम्ही डायलिसिस युनिट सक्षम करण्यासोबतच आधुनिक वैद्यकीय सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहोत.”
ही शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. कौशल कोंडावार, डॉ. अमीर तडवी, डॉ. उर्वशी, डॉ. शिवानी आणि ओ.टी. टेक्निशियन संध्या आळणे यांचे मोलाचे योगदान लाभले