आर.पी. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक 1.5 टेसला एम आर आए युनिटचे उद्घाटन
परभणी, दिनांक १३:
परभणी येथील आर.पी. हॉस्पिटलमध्ये भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त अत्याधुनिक 1.5 टेसला एम आर आर युनिटचे उद्घाटन माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी आ. डॉ. राहुल पाटील, मेडिकल कॉलेज व आर.पी. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. आमिर तडवी, डॉ. दीपक कुबडे, डॉ. दैठणकर, डॉ. संतोष हारकळ, डॉ. शहाजी बोडखे, डॉ. तांबोळी, डॉ. फैज, डॉ. भीमराव कनकुटे, डॉ. बाबासाहेब गायकवाड, राहुल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. वेदप्रकाश पाटील म्हणाले की, सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात MRI सेवा मिळणे आवश्यक आहे. 1.5 टेसला एम आर आय मशीन हे एक अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आहे, ज्याच्या साहाय्याने मेंदू, मणका, सांधे, मांसपेशी आणि इतर अवयवांशी संबंधित आजारांचे अचूक निदान शक्य होणार आहे.
आ. डॉ. राहुल पाटील म्हणाले की, सर्वसामान्य जनतेला आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे माझे प्रमुख उद्दिष्ट आहे. 1.5 टेसला एम आर आय व ट्रॉमा केअर युनिटच्या माध्यमातून रुग्णांना वेळीच आणि अचूक उपचार मिळतील.
या कार्यक्रमासाठी स्वप्नील बोर्डे, गोपाळ सुकरे, अतुल लोंढे आणि शिवाजी जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
५० टक्के सवलत उपलब्ध
डॉ. प्रमोद शिंदे यांनी सांगितले की, परभणी शहरातील इतर ठिकाणांपेक्षा ५० टक्के कमी दरात, म्हणजेच फक्त २४०० रुपयांपासून ही सेवा सर्वसामान्य रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे परभणी आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या शहरात जाण्याची गरज भासणार नाही. ही सेवा गंभीर रुग्णांसाठी वरदान ठरेल.
आर.पी. हॉस्पिटलमध्ये अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे, तज्ज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचारी उपलब्ध आहेत.